राजकीय

धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

म्हसावद व बोरणार येथे ऊ .बा. ठा. गटाला मोठा धक्का

खान्देश टाइम्स न्यूज l बोरणार/ जळगाव दि. ४ – “शिवसेनेत सामील झालेल्या या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत आहे. त्यांचा सहभाग पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. म्हसावद आणि बोरणार येथील उ. बा. ठा. गटाला मोठा धक्का बसला असून, पाळधी येथे शिवसेना प्रचार कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील ऊ .बा. ठा. गटाचे गट प्रमुख योगेश सोनवणे, बोरणार येथील संदीप धनगर, रामदास मराठे, आनंदा धनगर, गोविंदा बाविस्कर, मोहित धनगर, युसूफ पठाण, अमोल आण्णा धनगर, गौरव धनगर, सुरेश भोई, महेंद्र धनगर, तेजस धनगर, शिवाजी धनगर, आणि तेजस भोई यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या वेळी ललित रमेश पाचपोळ, सौरभ लखीचंद पाचपोळ, श्रीराम तोताराम पाटील, दानिश पठाण, नारायण आप्पा सोनवणे, प्रकाश श्रीधर पाटील, दिलीप माळी, भाजपचे बापू ठाकरे, राकेश ननव्हरे, संदेश झंवर, अमोल विजय पाटील आणि मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते.

धरणगावातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश !
धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील अनेक कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना कार्यालयात प्रवेश घेतला. शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देवून गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

शिवसेनेत प्रवेश : 
किशोर जुंझारराव, योगेश पाटील, शकील शाह, समीर शाह, निसार शाह, आकाश पांचाळ, अक्षय सोनवणे,रु पेश चौधरी, दिनेश गायकवाड, अतुल बिडकर, विशाल बिडकर ,दीपक खंडागळे, मुन्ना शाह, समीर शेख, आतिम शेख, आदिल शेख, समीर बेलदार, रिजवान बेलदार,आमन शाह, मुद्दात्सीर, गणेश झुंजारराव, दिवेयश गुरव, सोनू झुंझारराव आदींनी प्रवेश करून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ साठी सतत काम करणार असल्याचा निर्धार केला.

या प्रसंगी धरणगाव न.पा.चे मा. गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, अभिजीत पाटील, उपतालुका प्रमुख संजय चौधरी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नगराज पाटील, करण वाघरे, शफीबाई शाह, रविभाऊ महाजन, जितु चव्हाण, नगरसेवक अजय चव्हाण यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button