खान्देश टाइम्स न्यूज | १५ जुलै २०२३ | जळगांव जिल्हयात दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी होत आहेत. शहरात मोठी बाजारपेठ असल्याने जिल्हयातील नागरीकांची खरेदीसाठी खुप गर्दी होत असते याचाच फायदा घेवुन काही चोरटयांनी दुचाकी चोरण्याचा धडाकाच लावला होता. विशेषता शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचे प्रमाण खुप वाढले होते. शहर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली असून ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.
जळगाव शहरात दुचाकी चोरीचे प्रकार घडत असल्याने पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप गावित यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत विशेष लक्ष देवून सुचना केल्या होत्या. दि.१४ रोजी रात्री १२.३० आरोपी हे गुन्हयातील चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची बातमी सपोनि किशोर पवार, तेजस मराठे, किशोर निकुंभ यांना मिळाली होती. त्यामुळे पुर्वीच सापळा लावुन असलेले पथक अधिकच सतर्क झाले आणि रात्री १ वाजता चोरटे एस.एम.आय.टी कॉलेज परीसरात येताच त्यांनी दोघांना पकडले.
पथकातील सपोनि किशोर पवार सफौ बशिर तडवी, पोहेकॉ विजय निकुंभ पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोना प्रफुल्ल धांडे, पोना किशोर निकुंभ पोना गजानन बडगुजर, पोना योगेश पाटील, पोना राजकुमार चव्हाण, पोकॉ रतन गिते, पोकॉ तेजस मराठे, पोकॉ योगेश इंधाटे, पोकॉ अमोल ठाकुर यांनी दोघांना ताब्यात घेवुन विचारपुस करता दोघे अल्पवयीन असून त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दोघांकडून ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. दोघांकडून जिल्हापेठ पो.स्टेचे २ गुन्हे व शहर पो.स्टे.चे २ गुन्हे असे एकूण ४ गुन्हे उघड झाले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना किशोर निकुंभ हे करीत आहेत.