राजकीय

जयश्रीताईंचे स्वप्न : जळगावला राज्यात प्रगत आणि अग्रेसर बनवण्याचा निर्धार..

खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्याने आता जोर पकडला असून, शहराच्या विविध भागात त्यांनी केलेल्या प्रचार दौऱ्यांनी जळगावकरांचा कल आता जयश्री महाजन यांच्या बाजूने झुकायला लागला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आज (दि.१६) प्रभाग क्रमांक ७ मध्ये सकाळी प्रचार दौरा काढला होता. या दौऱ्याची सुरुवात ब्रुकबॉण्ड कॉलनी येथे होवून, हरेश्वर नगर, अजय कॉलनी, दिनानाथ वाडी, यशवंत कॉलनी, डेमला कॉलनी, नंदनवन कॉलनी, गणगोपी अपार्टमेंट, एल.आय.सी. कॉलनी या मार्गे मधुबन अपार्टमेंट येथे समाप्ती झाली. या प्रचार रॅलीत शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जळगावच्या विकासासाठी ठाम संकल्प
जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात जनसंवाद साधतांना नागरिकांना उद्देशून महत्त्वाची वचने दिली आहेत. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, “जळगावला राज्यात प्रगत आणि अग्रेसर शहर बनवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खाजगी प्रकल्प जळगावात आणण्यासाठी मी ‘ॲडव्हान्टेज जळगाव’ नावाची विशेष मोहीम मुंबईत राबवणार आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे मोठे प्रकल्प जळगावात येण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. जेणेकरुन इथल्या तरुणांना इथेच रोजगार मिळेल. त्यांना नोकरीसाठी बाहेरच्या शहरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.”

यावेळी पुढे बोलतांना जयश्री महाजन यांनी जगविख्यात कलाकार चार्ली चॅप्लिन यांच्या विचारांचा उल्लेख करत “माणसांच्या मनातला द्वेष दूर होईल, हुकूमशाही संपेल, आणि लोकांनी गमावलेली सत्ता पुन्हा त्यांच्या हातात येईल. जयश्री महाजन यांनी नागरिकांना २० नोव्हेंबर रोजी ‘मशाल’ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. “मतदान यंत्रावरील क्रमांक २ च्या ‘मशाल’ चिन्हासमोरील बटण दाबून मला तुमचे मतदानरूपी आशीर्वाद द्या. आपण सर्वांनी मिळून आपल्या जळगावच्या प्रगत आणि सर्वांगीण विकासासाठी एक निर्णायक बदल घडवायचा आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रचार दौऱ्यादरम्यान जळगावकर नागरिकांनी परिवर्तनाचा निर्धार केला असून, जयश्री महाजन यांना त्यांनी जिव्हाळ्याच्या शुभेच्छा देत त्यांना सक्रिय पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला. जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पुन्हा सुवर्णनगरी बनवण्याचा हा संकल्प आणि राज्यात प्रगत व अग्रेसर शहर बनविण्याचे स्वप्न आता जळगावकरांचे स्वप्न झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा संदेश दिला जात आहे.

यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, विजय बांदल, विजय राठोड, यश उपाध्ये, सागर उपाध्ये, पंकज व्यास, संजय सांगळे यांसह महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख निता सांगोळे, तसेच जया तिवारी, डॉ. अस्मिता पाटील यांसारखे प्रमुख कार्यकर्ते रॅलीत उपस्थित होते. नागरिकांनीही या प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात परिवर्तनाच्या आशेचा उत्साह दिसून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button