जळगाव-एकरा शिक्षण संस्थेद्वारा संचलित शहीद उर्दू हायस्कूल मेहरून येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेक जवेरी या दहावीच्या विद्यार्थ्याने संविधान बनवण्यासाठी लागलेले परिश्रम आणि संविधानाचा समानतेचा संदेश विद्यार्थ्यांसमोर सादर केला.
कसला शाळा या दहावीच्या विद्यार्थ्यांनी संविधानच्या उद्देशिकेचे विद्यार्थ्यांसमोर वाचन केले. याप्रसंगी हायस्कूलचे प्राचार्य काझी जमीरुद्दीन आणि इतर शिक्षकांनी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. संविधान हे समाजातील सर्वात गरीब आणि कमजोर वर्गाला संरक्षण देण्यास एक शक्तिशाली शस्त्र आहे. हे आता जितके मजबूत होईल तितकेच आपला देश हा शक्तिशाली होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी संविधानांच्या विचारधारेची सुरक्षा करणाऱ्या सैनिक शहीद आणि संविधान सभा च्या प्रत्येक सदस्यांचे स्मरण करून संविधानच्या रक्षा करण्यासाठी संकल्प करण्यात आला.