पारोळा धुळे -अपघात प्रकरणी अटक न करण्यासाठी 15 हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलिसाला धुळे लासलोस्पत विभागाच्या पथकाने आज अटक केली असून दुसरा पोलीस कर्मचारी मात्र घटनास्थळावरून प्रसार झाला. या पकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पारोळा ते धरणगाव रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चालकाला अटक न करण्यासाठी पारोळा पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोड अंतिम पंधरा हजार रुपयांची लाच देण्याचे निश्चित झाले. दरम्यान तक्रारदाराने धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या एका पथकाने आज 15000 रुपयांची लास्ट स्वीकारताना एका पोलिसाला रंगीहात अटक केली असून त्याचा दुसरा साथीदार मात्र प्रसार झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
धुळे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम ,मुकेश अहिरे ,सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर ,रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.