जळगाव : दुचाकी चे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील कोरपावली येथील राहुल संतोष सोनवणे हा दि. ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दुचाकीने क्रमांक (एमएच १९ ईएल ४०९७) जळगावकडून भुसावळकडे जात असताना नशिराबाद गावाजवळील एका ढाब्याजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकावर धडकली. यात राहुल हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. तर देवेंद्र दत्तात्रय तायडे (२२, रा. कोरपावली, ता. यावल) हे जखमी झाले. या प्रकरणी तायडे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहेत.