खान्देशजळगांवराजकीय

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी हनुमानाला साकडे!

जळगाव (प्रतिनिधी):- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा होण्यासाठी भाजप जिल्हा महानगरतर्फे श्री हनुमान मंदिर येथे आज सायंकाळी महाआरतीचे आयोजन आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी हनुमानाला साकडे घालण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा  देवेंद्र  फडणवीस व्हावेत यासाठी कोल्हा आणि मार्केट येथील हनुमान मंदिरात आज 28 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नवनियुक्त आमदार राजू मामा उर्फ सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महानगराध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे यांच्यासह भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button