जळगाव l १६ जुलै २०२३ l येथील स्व.सौ. श्व़ेता वाणी -नेवे फाउंडेशन तसेच नेवे समाज बहुउद्देशीय मित्र मंडळ जळगाव यांचे तर्फे स्व.सौ.श्व़ेता वाणी यांच्या तृतीय
स्मृतिदिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने दिनांक १६ जुलै २०२३ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येऊन सदर शिबिरात १८ बॅगचे रक्त संकलन करण्यात आले.यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे डॉक्टर तासखेडकर,सौ सुनीता वाघ, किरण बावस्कर,व सौ रूपाली बडगुजर यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिरात शैलेश वाणी यांनी ८६ वेळा व सौ. शिखा शैलेश वाणी यांनी ६१ वेळा रक्तदान करून अमोल सहकार्य केले व सामाजिक बांधिलकी जपली. सदर शिबिराचे यशस्वी साठी फाउंडेशन तर्फे अध्यक्ष मिलिंद नेवे वाणी, सचिव सौ.शिखा वाणी, अजिंक्य नेवे, आदित्य वाणी ,चंद्रकांत वाणी, रेणुका नेवे शैलेश वाणी व नेवे समाज मित्र मंडळातर्फे श्री सुभाष नेवे,धीरज व नवीन दलाल यांनी परिश्रम घेतले.