काळजी बाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर
गोंदिया :-नागपूरहून गोंदियाकडे असलेली शिवशाही बस उलटल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डब्बा गावाजवळ घडली. या घटनेत आठ प्रवासी ठार झाले असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केले आहे.
घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ,गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गोदिंयामधील शिवशाही बस अपघातावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्सवर पोस्ट करत अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.