खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळ येथे रेल्वे रुळावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

भुसावळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या डाऊन रेल्वे ट्रॅकवर २८ रोजी ३ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला.

याबाबत सरस्वती नगरमधील रेल्वे कर्मचारी शुभमकुमार शंभुप्रसाद यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. अंगाने सडपातळ, अंगात पिवळ्या रंगाचे फुल बाहीचा शर्ट, त्यावर काळे ठिपके असलेला व

आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट, उजव्या हाताच्या मनगटावर जयसेतू, मंदिराचे चिन्ह, संदिप, मॉ असे गोंदलेले आहे.

तसेच लवच्या चिन्हामध्ये इंग्रजित गोंदलेले. हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे. अशा अनोळखी अंदाजे ३० ते ३५ वर्षाच्या तरुणास मालगाडीने धडक दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ओळख पटवण्यासाठी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button