खान्देशजळगांव

औषधांची आवश्यकता असल्याचे सांगत चाळीसगावच्या एकाला सहा लाखात गंडविले !

जळगाव ::- औषध साखरेची आवश्यकता असून एका अनोळखी व्यक्तीने चाळीसगावच्या मेडिकल चालकाला सहा लाख सात हजार रुपयांमध्ये गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव)  हे वास्तव्यास असून त्यांचे मेडीकल आहे. त्यांना दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता एका अनोळखी व्यक्तीने मोबाईवरुन संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यासाठीची यादी व्हाटसअॅपवर पाठवतो, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा असे सांगितले. यादी मिळाल्यावर समोरील व्यक्तीने तम्ही फोन पे वरुन दहा रुपये पाठविण्यास सांगितले. सुनिल चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले.

सुनिल चौधरी यांचा मुलगा जयदीप याला चौधरींच्या मोबाईलच्या फोन पे अॅपमधील इंटर क्रेडीट कार्ड डिटेल्स, बँकेचे नाव व १ लाख ३९ हजार ५८० रुपयांचा तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर भामट्याने चौधरी यांच्या बँक खात्यातून ६ लाख ७ हजार ७०० ऑनलाईन काढून घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  याबाबत चौधरी यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button