जळगाव : क्रिकेट खेळताना मोकळ्या पटांगणात खेळणाऱ्या मुलांमध्ये वाद होऊन दोन गटात तुफान दगडफेक होऊन यात दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे .याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दगडफेकीत विजय रमेश जयस्वाल (वय ४०) व निशांत अमर जयस्वाल (वय २५) हे दोघे जखमी झाले.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील मेहरुण परिसरातील राम नगराला लागून असलेल्या गजानन नगरातील खुल्या जागेत शनिवारी काही मुलं क्रिकेट खेळत होती. यावेळी त्या तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला, यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन गटात दगडफेक झाली यात विजय जयस्वाल व निशांत जयस्वाल हे दोघं जण जखमी झाले. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नियंत्रणात आणली.
दगडफेकीच्या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित हरदन अक्रम खान याच्यासह अन्य तीन अशा चार जणांना ताब्यात चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान जखमी व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.