
हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन व रोटरी क्लबतर्फे आरोग्य शिबिर व मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचे आयोजन
जळगाव, प्रतिनिधी :- हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन आणि जळगाव रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ११ मे रोजी गणपती नगर येथील रोटरी क्लब हॉलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
यानंतर मंगळवार, दि. १३ मे रोजी गरजू ८ व्यक्तींच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. या शस्त्रक्रिया नव्या बसस्थानकाजवळील विष्णू लिला डोळ्यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. तुषार फिरके यांनी मोफत केल्या.
शस्त्रक्रियांनंतर लाभार्थ्यांनी हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन आणि जळगाव रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बिल्डिंग पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष इस्माईल खान, जळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, डॉ. जयंत जहागीरदार, मेडिकल कमिटीचे चेअरमन डॉ. तुषार फिरके आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदू-मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर असोसिएशन आणि जळगाव रोटरी क्लबने डॉ. तुषार फिरके यांचे विशेष आभार मानले. या सामाजिक उपक्रमामुळे गरजू व्यक्तींना मोफत वैद्यकीय सेवा मिळाली असून, समाजात एकतेचा संदेशही पोहोचला आहे.