जळगाव:- शहरातील एका अपार्टमेंट मधून 75 हजार रुपयांचा एवज चोरी झाल्याची घटना घटना उघडकीस आले होते या प्रकरणी तीन महिने उलटून देखील चकवा देणारा चोरटा सापडून येत नव्हता. मात्र पोलिसांनी चक्र फिरवून चोरट्याला शिरपूर तालुक्यातील आर्वी येथून एका हॉटेलमधून प्रवीण दारसिंग पावरा (वय २१. रा. हिवरखेडा ता.शिरपुर, जि. धुळे) याचया आर्वी धुळे येथील हॉटेलमधून मुसक्या आवळल्या..
चांडक हॉस्पिटलच्या मागील अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या कुंदन भटू सोनी हे वास्तव्यास होते. .त्यांच्याकडे कानबाई मातेचा उत्सव असल्याने नातेवाईक आले होते. रात्री उशिरापर्यंत उत्सव साजरा करुन त्यांचे कुटुंबिय झोपून गेले. यावेळी संशयित चोरट्याने पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या खिडकीतून घरात प्रवेश करीत १४ ग्रॅमची सोन्याची पोत व दोन मोबाईल असा एकूण ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोहेकों दत्तात्रय हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्याकडे दिला होता.
त्यांनी पथकातील योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करीत संशयीत प्रवीण पावरा याला आर्वी धुळे येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.