जळगाव(प्रतिनिधी) मेहरून परिसरात असणाऱ्या शहरा चौकात राहणाऱ्या आणि विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली होती.
मात्र पोलिसांनी केलेल्या तपासातून ही गोळीबारी शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांनी मतदारांची सहानुभूती मिळून आपण निवडून येऊ यासाठी केल्याचे निष्पन्न झाल्या असून पोलिसांनी त्यांच्यासह इतरांना अटक केली आहे.
अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक बाजूने तपास केल्यानंतर अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी आपला भाचा, मुलगा शालक आणि त्याच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या घरावर गोळीबार करण्याचे षड्यंत्र रचले.
सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकारात पोलिसांना कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय होता शेवटी खबऱ्यांचे नेटवर्क मधून माहिती मिळाली की अपक्ष उमेदवारानेच हे सगळे षडयंत्र आपल्या चालकाच्या सोबत मिळून रचले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी इरफान अहमद मोहम्मद हुसेन, शेख अहमद शेख हुसेन, शेख शिबान फाईज अहमद हुसेन, मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोळीबार करणारा मोहम्मद शफीक उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हे दोघे फरार असून इतर आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
गोळीबार झाल्यापासून संपूर्ण प्रकरण संशयास्पद होतं. तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाला आहे. गोळीबार करून लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे. तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे.
-महेश्वर रेड्डी
(पोलीस अधीक्षक, जळगाव)