पुणे:/जळगाव ;– राज्यात हवामान कोरडे झाल्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्यात सांत कमी तापमान जळगाव येथे ८.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, दरम्यान, राज्यात थंडीमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेले तीन दिवस राज्यातील डगाळ हवामान कमी झाले असून वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वारे पुन्हा वाहू लागले आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांचे किमानतापमान १५ अंश सेल्सिअसच्या आतमध्ये आहे. तसेच मराठवाडा व विदर्भातही तापमान घटले आहे. थंड वाऱ्यांमुळे दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. सोमवारी सर्वात जास्त तापमान सोलापूर येथे ३३ अंश सेल्सिअस होते.