जळगाव:- शहरतील विविध महाविद्यालय परिसरांमध्ये भरधाव वेगाने दुचाकी पळविणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहर वाहतुक पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे शंभर दुचाकी वाहतुक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या, पहिल्याच दिवशी दोन लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, रात्रीपर्यंत पालकांची शहर पोलिस ठाणे आवारात गर्दी होती. दरम्यान, पाल्यांमुळे त्यांच्या पालकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे यापुढे हा भुर्दंड टाळण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षेसाठी अल्पवयीन मुलांना वाहने देणे टाळावे लागणार आहे.
शहरातील वाहते अपघात लक्षात घेता अल्पवयीन मुलांसह विना वाहनपरवाना दुचाकी चालविणाऱ्या विद्याथ्यांना आळा बसाचा. गासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सुरुवातीला शाळा, महाविद्यालय, क्लासेसला पत्र पाठवून जनजागृती केली. तरीदेखील शहरात अल्पवयीन मुले वाहने घेऊन सुसाट फिरत असल्याची बाब कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवारपासून वाहतुक पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. शहरातील मू.जे. महाविद्यालय परिसरात व त्याच्या आजूबाजूला असलेल्या क्लासेस जवळ वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केली. या वेळी या एकाच परिसरात १०० अल्पवयीन दुचाकीस्वार आढळले.
वाहन सोडविण्यासाठी पालकांची गर्दी ज्या अल्पवयीन मुलांकडे परवाना नसतांना ते दुचाकी चालवित आहे. अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करीत त्यांची वाहने वाहतुक पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. वाहन सोडविण्यासाठी पालकांनी रात्रीपर्यंत गर्दी केले होती.