जळगाव : शहरातील रायसोनी नगर मधून बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या चादीची दागिने अज्ञात चोट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रायसोनी नगरात आकाश पाटील हे वास्तव्यास आहेत. जळगाव तालुक्यातील वडली येथे घराचे काम सुरू असल्याने ते तेथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख १० हजार ५०० रुपयांसह दोन तोळे सोन्याचे पोत, अंगठी व चांदीची देवीची मूर्ती असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना दि. ७ रोजी शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी आकाश पाटील यांना माहिती दिली. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.