धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) ;- राज्य परिवहन महामंडळाच्या बस अपघाताची जिल्ह्यात मालिका सुरू असून शुक्रवारी झालेल्या बसच्या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कामावर जाऊन आढळल्याने झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. आज शनिवारी 14 रोजी सलग दुसऱ्या दिवशी एसटी महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर अन्य 21 प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळे फाट्याजवळ घडली. प्रवाशांना तातडीने ग्रामस्थांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून याबाबत अपघाताची नोंद पोलिसात करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०)नेपिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढील भाग अक्षरशः कापला गेला यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. यामध्ये एक प्रवासी जागी ठार तर 21 प्रवासी जखमी झाले असून बस चालक यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघातात जखमी प्रवाशांची नावे
जाकीर शब्बीर खाटीक (वय -३५, रा. पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), सुनील रामसिंग अलकारी (वय -५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) , जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठी वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (वय -३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (वय -७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव), असे प्रवासी जखमी झालेले आहेत.
जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल :
दरम्यान या भीषण अपघातात जखमी झालेल्या २१ प्रवाशांना तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक पवन दिसले यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. याबाबत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते