खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव पोलिसांनी लावला 39 दुचाकी चोरीचा छडा !

जळगाव शहर पोलिसांनी 19 दुचाकीसह एकाला केली अटक 

जिल्हा पेठ पोलिसांनी 20 दुचाकी चोरणारे पाच भामटे केले जेरबंद

जळगाव प्रतिनिधी I –शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चोरीच्या १९ तर जिल्हापेठ पोलिसांनी २१ दुचाकी अशा ३९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या दुचाकी चोरीमध्ये जळगाव शहर पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली असून जिल्हा पेठ पोलिसांनी 21 मोटरसायकली चोरी प्रकरणी  पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे..

जळगांव जिल्हयात मोटर सायकल चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मो.सा. चोरीचे गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी जळगांव शहरातील शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन करुन मो.सा.चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

शहर पोलिसांनी रचला सापळा
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने जळगांव शहरातील एम.एम मास्टर तिजोरी गल्ली येथुन चोरी झालेल्या दुचाकीचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाचा तपास चालु असतांना गुप्त बातमीदारां मार्फत मिळवुन व नेत्रम येथील कर्मचारी मुबारक देशमुख यांच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पडताळणी करुन घेवुन व त्याचेकडून फुटेज प्राप्त करुन जळगांव शहरातील चित्रा चौकात जळगांव शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचला.

चोरीच्या १९ दुचाकी हस्तगत
फुटेजमधील संशयित आरोपी आसिफ बशीर पटेल वय-३५ रा.दहीगांव ता.यावल यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात असलेली जिल्हापेठ पो.स्टे. येथुन चोरीस गेलेली १ मो.सा. काढुन दिली व जळगांव शहर पो.स्टे. येथे आणले असता त्याने शहर पो.स्टे हद्दीतील चोरुन नेलेल्या इतर १८ मो.सा. अशा एकुण १९ मो.सा.चोरल्याची व त्या यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे विकल्याची कबुली दिली. त्यास अटक केली असुन त्यावर आरोपीतावर यापुर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसुन जळगांव शहर पो. स्टे हद्दीत घडलेल्या १९ मो.सा. चोरीचे गुन्हे तसेच जिल्हापेठ पो.स्टे येथील २ गुन्हे उघडकीस आलेले आहे. तसेच जळगाव शहरातील इतर पो.स्टे.ला गेलेल्या इतर गुन्हयाचा उकल करीत आहोत.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सपोनि रामचंद्र शिकारे, उपनिरीक्षक राजु जाधव, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, पांचाळ, प्रणय पवार अशांनी केली आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी शोधल्या २० दुचाकी
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन रा.धानोरा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट रा.वाघळूद, अविनाश सुनील पाथरवट रा.वाघळूद, शाहरुख रमतुल्ला खाटीक रा.लक्ष्मीनगर, जळगाव सुरेश उत्तम मोरे रा.वाघळूद यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून २ रावेर येथे आहेत.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील सपोनि संतोष चव्हाण, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोना.राजेश पदमर, पोकॉ.मिलींद सोनवणे, पोकॉ.राहुल पाटील, पोकॉ.अमितकुमार मराठे, पोकॉ.प्रशांत सैदाणे, पोकॉ.नरेंद्र दिवेकर, पोकॉ.प्रविण जाधव, पोकॉ.विकास पहुरकर
अशांनी केली आहे.
[12/13, 6:50 PM] Anand gore: जळगाव (प्रतिनिधी) ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकली चोरीच्या घटना वाढल्या असताना जळगाव शहर पोलीस आणि जिल्हा पेठ पोलीस यांनी एका मोठ्या चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 39 दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सूत्राने दिलेली माहिती अशी की जिल्ह्यात होणाऱ्या मोटरसायकली चोरी प्रकरणी आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, आपण पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने तिजोरी गल्लीतील दुचाकी चोरीचा शोध घेतला असता गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळवून नेत्रांचे कर्मचारी मुबारक देशमुख यांच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पडताळणी करून फुटेज द्वारे जळगाव शहरातील चित्रा चौकात शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाने सापळा रचून संशयित आसिफ बशीर पटेल वय 35 रा. दहिगाव ता. यावल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथून चोरलेली एक मोटरसायकल काढून दिली तसेच शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरलेल्या 18 अशा एकूण 19 दुचाकी चोरल्याची माहिती त्याने दिली. या चोरीच्या दुचाक्या यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे विकल्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल असताना घडलेल्या 19 दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात जिल्हा पेठ येथे दाखल दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भावारी यांच्या पथकातील सपोनी रामचंद्र शिकारे, उपनिरीक्षक राजू जाधव, साहेब फौजदार सुनील पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकूर, श्री पांचाळ, प्रणय पवार आदींच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button