पाचोरा : शहरातील नगरपालिकेसमोरिलशॉपिंग सेंटरमधील कृषी सेवा केंद्रास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तत्काळ पालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली.सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी कृषी केंद्र चालकाचे जवळपास ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शहरातील रेल्वे स्थानक रोडवर रामराव पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांपूर्वी धरती धन कृषी सेवा केंद्र या नावाने भाडेतत्त्वावर दुकान सुरू केले होते. १८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या वेळेस ग्राहक नसल्याने रामराव पाटील हे सायंकाळी ५ वाजता कृषी सेवा केंद्र बंद करुन शहरातील गणेश कॉलनी स्थित घरी निघून गेले. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता धरती धन कृषी सेवा केंद्रातून आगीचे लोट
उठत असल्याने आणि क्षणार्धात आग भडकली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.
आगीत रामराव पाटील यांच्या दुकानात असलेले खते, बि बियाणे, रासायनिक खते असे जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रसंगी