जळगाव प्रतिनिधी;- जळगाव शहरातील भुसावळ रोड परिसरात असणाऱ्या दोन हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी छापा टाकला असता या ठिकाणी तीन जणांना अटक करण्यात आले असून एका महिलेची सुटका करून एक बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना भुसावळ रोडवरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळ हॉटेल चित्रकूट मध्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी पंचायत सह डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली असता हे खरे ठरले. त्यानुसार हॉटेल चित्रकूट मध्ये छापा काउंटर वरील निलेश गुजर व चेतन माळी यांचे अंग झडती घेतली असता 1500 रुपये रोख मोबाईल आढळून आले. हॉटेलमध्ये एका डमी ग्राहकासह एक महिला आढळून आली. त्या महिलेची चौकशी केली असता हॉटेलचा व्यवस्थापक विजय तायडे याचा मार्फत ती आली असल्याची माहिती तिने पोलिसांना सांगून तिच्यासोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यश मध्ये असल्याचे सांगितले. त्यानुसार हॉटेलचा व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतल्यास साठी बांगलादेशी असल्याचे आढळले.
हॉटेलचा व्यवस्थापक असणाऱ्या विजय तायडे याचा बांगलादेशची तरुणीचा संपर्क होऊन देह व्यापाऱ्याच्या बदल्यात पैसे मिळण्याचे सांगून आणले होते. याबाबत गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तुझ्या दिल्यावरून निलेश गुजर ,चेतन माळी, विजय तायडे यांच्यासह बांगलादेशच्या तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनी गणेश वाघ, उपविभागीय कार्यालयाचे विकास महाजन, सुहास पाटील, गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण, गणेश ठाकरे, आदींच्या पथकाने केली.