स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई
मुक्ताईनगर;- शहरातील लक्ष्मीनारायण प्रोविजन नावाच्या किराणा दुकान बंद करताना जवळच पाळत ठेवून असणाऱ्या पाच जणांनी येत चाकूने वार करीत पिशवीतील दहा हजार रुपये ची रोकड जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना 19 रोजी घडली होती या प्रकरणी पोलिसांनी भुसावळच्या पाच जणांच्या टोळीला एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरात प्रवर्तन चौकाजवळ रविंद्र रमेश खेवलकर हे दि.१९ रोजी आपले दुकान बंद करून बाहेर वडील आणि भावासोबत उभे होते. लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोरील फिर्यादी यांचे पानटपरीजवळ उभे असताना फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर चाकुने वार करुन फिर्यादीच्या हातातील एका पिवळ्या रंगांचे पिशवीतील १० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकवुन घेवुन पळुन गेले होते. दरम्यान, झटापटीमध्ये मंगेश खेवलकर यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.
गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करुन तिथे मिळालेल्या माहिती आणि तांत्रिक विश्लेषणातून तसेच गुन्हा करतांना वापरलेली गुन्ह्याची पध्दत ही यापुर्वीचा रेकॉर्डवरील आरोपी प्रेम उर्फ गोपी अनिल धामणे, रा.वाल्मीक नगर भुसावळ याने केल्याचा संशय होता. पथकाने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता साथीदार रोहीत उर्फ दादु संजय नवघीरे, रा.वाल्मीक नगर भुसावळ, रिहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख, रा.जाममोहल्ला भुसावळ, कुंदन अनिल पठाळे, रा.भुसावळ यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली
सर्व संशयितांकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेला गावठी कट्टा, ४ मोबाईल फोन, बुलेट, एक दुचाकी तसेच फिर्यादीकडून हिसकावलेले १० हजार रोख असे गुन्ह्याकामी रिकव्हरकरून वरील सर्व आरोपीतांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन C.C.T.N.S.No ४३४/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०९ (६) शस्त्र अधि. १९५९ कलम ४/२५ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे.ला जमा करण्यात आले आहे. गुन्ह्यात वाढीव कलम लावून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयीतांना ६ दिवस पोलीस सुनावले आहे.
यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकातील सपोनि राजेंद्र चाटे, सपोनि जयेश पाटील, पोना महेंद्र सुरवाडे, पोना सुरेश मेढे, पोकॉ गोविंदा पवार, सुनिल मोरे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, एलसीबीचे पोउपनिरी शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंशी अशांनी कारवाई केली आहे.