माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील आणि उद्योजक धनराज कसाट यांचे सहकार्य !
जळगाव (प्रतिनिधी) येथील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा यांना माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व उद्योजक धनराज कासाट यांच्या सहकार्याने एक दिवसीय शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शनाची सहल आयोजित करण्यात आली होती.
संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांना गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खूप आनंद झाल्याचा भावना व्यक्त केल्यात. गाडीतील प्रवासात त्यांनी खूप मजा करत भक्ती गीत म्हणत ह्या सहलीत आनंद उत्सव केला. यावेळी आजी-आजोबांनी गजानन महाराजांचे दर्शन घेत प्रसादाचा आस्वाद घेतला. आजी-आजोबांनी प्रतापराव पाटील , धनराज कासाट , रेखा पाटील यांचे मनापासून आभार मानले व त्यांच्यासाठी प्रार्थना केली. तसेच जाण्यापासून ते येण्यापर्यंतचे नियोजन चांगल्या रीतीने आणि उत्कृष्ट केल्याबद्दल पत्रकार सोनम पाटील यांनी केले होते. दरम्यान, या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बस डेपोचे गाडी चालक श्रीकृष्णा पाटील कंडक्टर विलास वराडे यांनी ही चांगले सहकार्य केले.
तसेच आश्रमातील जळगाव शहर महानगरपालिका जळगाव आयुक्त साहेब जळगाव शहर महानगरपालिका उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक उपायुक्त अश्विनी गायकवाड , शहर अभियान व्यवस्थापक मनपा गायत्री पाटील, संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संस्थाचालक प्रशांत गायकवाड , डॉ. फारुख पटेल , संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक मनोज कुलकर्णी , काळजीवाहक शितल काटे , राजेंद्र मराठे , हर्षल वंजारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.