जळगाव : ;- विनापरवाना अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर 24 रोजी तालुका पोलिसांनी पकडले असून याबाबत तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता खोटे नगर येथे गस्तीवर असताना विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. त्यावेळी ट्रॅक्टर चालक तुकाराम रामचंद्र सोनवणे (वय ३५, रा. सावखेडा ता. जळगाव) यांच्याकडे वाळू वाहतुकीची कोणतीही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक तुकाराम सोनवणे यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.