
विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्स व किशोरवयिन् मुलांच्या समस्यावर मार्गदर्शन
संत ज्ञानेश्वर विद्यालयात जनजागृतीपर मार्गदर्शन
जळगाव प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम, जळगाव यांच्या अंतर्गत इंटेन्सिफाइड कॅम्पेनिंग 12 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक शाळेत, महाविद्यालय व गावपातळीवर येथे राबवण्यात येत आहे.
याच अनुषंगाने आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या तर्फे एचआयव्ही/एड्स विषयी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्या मध्ये मुख्य वैद्यकीय कार्यालयाच्या कार्यालयातील मनीषा वानखेडे ,श्रीमती रुपाली दीक्षित ,मिलन वाघोदेकर,उज्वला पगारे ,श्रीमती.निशिगंधा बागुल. तसेच TCI चे प्रोग्राम मॅनेजर श्री.दीपक धनगर यांनी शाळेला भेट दिली .
यावेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही आणि एड्समधील फरक, एचआयव्ही प्रसारित होण्याच्या सर्वात सामान्य पद्धती, एचआयव्ही प्रसारित न होण्याचे मार्ग, एचआयव्ही/एड्स असलेल्या लोकांमध्ये भेदभाव आणि तो कसा थांबवावा इत्यादींबद्दल प्रबोधन केले. व तसेंच च किशोरवयिन् मुलांच्या/ मुलींच्या समस्या व त्याच्यात होणारे बदल यावर ही प्रबोधन करण्यात आले .
त्याचं प्रमाणे विद्यार्थ्यांकडून संसाधन व्यक्ती पर्यंत प्रश्नोत्तरांच्या फेरीने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसह भाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी कर्मचारी वर्गाचे आभार मानले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक उपस्थित होते.




