अमळनेर :-सोलर केबल चोरी केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील वावडे गावात घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून धुळे जिल्ह्यातून पाच जणांना अटक केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महावितरण कंपनीने अमळनेर तालुक्यातील वावडे गावात सोलर प्लांट उभारला असून या सोलर प्लांट च्या केबल चोरून नेणारेसंशयित गोकुळ हिरामण कोरडकर (वय २५), गोकुळ जानकू थोरात (वय २४), जिभाऊ वामन थोरात (वय २८, तिघ रा. रायपूर, ता. साक्री, जि. धुळे), गोकुळ राजेंद्र भामरे (वय २४), राकेश धनराज पाटील (वय २४, रा. कापडणे, ता. साक्री, जि. धुळे) यांनी चोरले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक गणेश वाघमारे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहूल कोळी, राहुल बैसाणे, दीपक चौधरी, महेश सोमवंशी यांच्या पथकाने या पाच जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांचे इतर पाच साथीदार मात्र पसार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे.