भडगाव येथे वाळूने भरलेल्या भरधाव डंपरच्या धडकेत तीन म्हशी ठार !
भडगाव ते वाक रस्त्यावरची घटना
भडगाव (प्रतिनिधी ) ;- भडगाव ते वाक रस्त्यावर वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत ३ म्हशीठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
म्हशींना शेतामध्ये चारण्यासाठी घेऊन जात असतांना भडगाव ते वाक दरम्यान जुना महिदंळे रस्त्याच्या कडीलगत असणाऱ्या विटभट्टीजवळ वाक गावाकडून भडगावकडे येणारा टाटा कंपनीचा डंपर (एमएच-४३, बीपी-७८४२) ने समोरून येणाऱ्या म्हशींना जबर धडक दिली.
यात चार म्हशींपैकी ३ म्हशी जागीच ठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . धाक इतकी जोरदार होती कि , मृत म्हशींना अक्षरशः जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत कुठलीही नोंद झाली नव्हती.