जळगाव I प्रतिनिधी येथील इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक ९ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान दत्तक गाव नशिराबाद, जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ येथे करण्यात आले. शिबीराच्या चौथ्या दिवशी दुस-या सत्रात .उमेश पाटील यांचे व्याख्यान मियॉंवाकी कुलपती धनवन योजना या विषयावर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफीज, नसरीन खान तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.
प्रा. शेख सुहैल आमिर यांचे व्याख्यान
जळगाव येथील इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक ९ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ नशिराबाद येथे करण्यात आले. शिबिराच्या दुसऱ्या सत्रात प्रा. शेख सुहैल आमिर यांचे ‘इंडिया मधुन भारत निर्माण करणे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.तनवीर खान, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज आणि डॉ . शबाना खाटीक हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबा पटेल आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.