अमळनेर तहसील आवारातील जप्त केलेल्या ट्रॅक्टरची चोरी
अमळनेर : अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडून तहसील कार्यालयात जमा केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून चोरीस गेल्याची घटना मकरसंक्रांतीला घडली. आशिष पारध्ये यांनी फिर्याद दिली आहे, त्यात म्हटले आहे की, त्यांनी ३१ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजता रणाईचे शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच- १९ बीजी- ९०२०) व विना क्रमांकाची ट्राली पकडली । होती. तर हे ट्रॅक्टर तहसील आवारात जमा केले [ होते. यात ट्रॅक्टर चालक संदीप सुभाष भील व । मालक सचिन संचिलाल भील हे दोन्ही ही मोहाडी येथील रहिवासी आहेत. ट्रॅक्टर मालकाला तहसील । कार्यालयात बोलावून त्याला दंडाची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्याने दंड न भरल्याने ट्रॅक्टर । तहसील कार्यालयात जमा होते. दरम्यान, १४ । जानेवारीला लिपिक जगदीश पाटील यांना ट्रॅक्टर । तहसील आवारात न दिसल्याने तहसीलदार [ रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशाने अमळनेर । पोलिसात दीड लाखाचे ट्रॅक्टर आणि १३ हजार [ ३२६ रुपयांची वाळू असा एकूण १ लाख ६३ हजार ३२६ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.