
शासकीय रुग्णालय व महाविद्यालय जळगाव यात अत्याधुनिक सुविधा व उच्च स्तरीय उपचाराकरिता डॉक्टराची सुविधा नसल्याबाबत निवेदन सादर
1) शासकीय रुग्णालय व महाविद्यालय जळगाव रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा व उच्चास्तरीय उपचाराकरिता डॉक्टरांची गैर सोय व सुविधाबाबत गौर गरीब लोकांना याचा फायदा मिळत नसल्या बाबत सदरचा निवेदन देण्यात आले.
2) शासकीय रुग्णालय व महाविद्यालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उच्च स्तरीय उपचाराकरिता जसे कि, कर्डीयॉलॉजिस्ट, नयुरोसेर्जेन, नियुरो फिजीसियन, पीडिया्ट्रिक सुर्जेन, नेफ्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट , असे गंभीर प्रकारचे उपचाराकरिता रुग्णालयात कोणत्याही डॉक्टर किंवा त्या उपचारासाठी लागणारे अत्याधुनिक मशीनरी जसे कि, एम.आर. आय, टू.डी. इको.
एन्डओसकॉपी, या सुविधा पासून गौर गरीब लोक वंचित असल्याने त्यांना इतर बाहेरील हॉस्पिटल चे मार्ग पाहावे लागत आहे.
3) सदर रुग्णालयात लहान मुलांसाठी व महिला प्रसूतीकक्षा करिता बाहेरून एका महिला आपल्या रुग्णालयात सेनेटरी पेड, व लहान मुलांसाठी लागणारे कापड डायपर हे फार बिकट अवस्थेचे घेतेले जात असल्या कारणामुळे काही लहान मुलना त्वचाचे आजार सुद्धा झालेले आहे.
4) तसेंच काही डॉक्टर त्याचे बाहेर खाजगी रुग्णालय असलाने ते वेळेवर सदर रुग्णालयात वेळेवर हजार राहत नसल्याने गिर गरीब लोकांना त्याचा फायदा मिळत नसल्याने दिसून आले आहे
5) तसेंच सदर उच्च स्तरीय उपचाराकरिता रुग्णांना होत असलेली गैर सोयीमुळे बाहेरगावी स्थलांतर करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांकडे त्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याचे बाहेर इतर रुग्णालयात जात असताना त्यांचे सुद्धा मृत्यू झाल्याने दिसून आलेले आहे.
सदर वरील मुद्दावर निवेदन मा. अधिष्ठाता नामें मा श्री. गिरीश ठाकूर यांना आज रोजी उद्धव बाळासाहबे ठाकरे शिवसेना वैधकीय आघाडी यांचे महानगर प्रमुख शरद आबा तायडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वैधकीय आघाडी उपमाहानगर प्रमुख राहूल महिपाल पारचा, तसेंच उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, विभाग प्रमुख किरन भावसार, वैद्यकीय आघाडी शाखा प्रमुख रेहमान खान डॉ.दरबारसिंग राजपूत, सागर पवार, दिनेश पवार, दीपक सुरवाडे, नागेश सुरवाडे आदी सदस्य व गावातील नामांकित व्यक्तीच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले