
इकरा शाहीन उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये उत्साहात हिंदी दिवस साजरा
जळगाव : येथील इकरा शाहीन उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली, त्यानंतर विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या आणि हिंदी भाषेच्या महत्त्वावर भाषणे सादर केली आणि इतर विद्यार्थ्यांनीही तक्ते तयार केले.
याप्रसंगी शाळेचे हिंदी विभागप्रमुख शेख रोशन शेख मुश्ताक, शेख अनिसा सुजाउद्दीन मैडम आणि नूरजहा देशपांडे मैडम यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. प्राचार्य काझी जमीर सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की हिंदी ही आपली मातृभाषा आहे आणि तिचा आदर करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना अभिमानाने हिंदीचा वापर करण्याचे आणि तिच्या संवर्धनात योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षकांनी केले आणि शेवटी आभार प्रदर्शनाने हिंदी दिवस उत्सवाची सांगता झाली.
या प्रसंगी इरफान अब्दुल करीम सालार साहिब, इकरा अध्यापन विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य शेख इरफान इक्बाल, प्राध्यापक शेख अझीमुद्दीन, इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मेहरूण जळगावचे प्राचार्य काझी जमीरुद्दीन सईदुद्दीन, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.





