खान्देशगुन्हेजळगांवशासकीय

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम निंबाळकर यांना पदक जाहीर

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम निंबाळकर यांना पदक जाहीर

पोलीस महासंचालक पदानेही झाला सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) : येथील पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखा येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शिवाजी निंबाळकर यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती यांना उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आलेले आहे. पोलीस दलात त्यांनी ३५ वर्षे सेवा केली आहे.

पोलीस दलात ५६ वर्षीय उपनिरीक्षक तुकाराम शिवाजी निंबाळकर हे २५ जानेवारी १९९० साली भरती झाले. मूळ पुनगांव ता.पाचोरा येथील रहिवासी तुकाराम निंबाळकर यांनी पोलीस मुख्यालय, जळगांव, आय.बी. जळगांव युनिट, रावेर पो.स्टे, एरंडोल पो.स्टे, स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी आणि आता जिल्हा विशेष शाखा येथे सेवा देत आहेत. (केसीएन)रावेर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असतांना सण १९९९ मध्ये दिवाळी सणाच्या दरम्यान जातीय दंगल उसळली होती. त्यावेळी योग्य ती कार्यवाही करणेकामी पो.उप.नि. भारत काकळे यांची मार्गदर्शनाखाली शातंता प्रस्थापित करण्यास मदत केली होती.

एरंडोल पो. स्टे हद्दीत २००३ ते २०१० या काळात शहरात गोपनीय शाखेत काम करुन सर्वधर्मीय समाजाबरोबर राष्ट्रीय एकात्मता टिकवुन ठेवण्यास मदत केली आहे. तसेच एरंडोल पो. स्टे ला ५ प्रकरणात फरार अटक आरोपी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलेले आहे.(केसीएन)महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यामध्ये चांगले काम केलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथे असताना २०११-१४ वेळी चाळीसगांव पो.स्टे ला दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी यास ८ वर्षानंतर एरंडोल येथुन ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

भातखंडे ता. पाचोरा येथे दर्गावरील चोरी प्रकरणात १५ किलो चांदी व आरोपी ताब्यात घेत सदरील गुन्ह्यात मोलाची कामगिरी केलेली आहे. पारोळा तालुक्यातील रत्नपिंप्री गावी खून प्रकरणात आरोपीतांना शोध घेवुन चांगली कामगिरी, शेळावे ता. पारोळा गावी श्रीराम मंदीरात अज्ञात आरोपीतांनी दरोडा टाकुन चोरी केल्याने दाखल गुन्ह्यात ४ आरोपीतांना मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कारवाई पीएसआय निंबाळकर यांनी केली आहे.

एम.आय.डी.सी पो.स्टे येथे गोपनिय शाखेत काम करुन सर्वधर्मीय समाजाबरोबर राष्ट्रीय एकात्मता टिकवुन ठेवण्यास मदत केली आहे. आजपर्यंत बजावलेली कामगिरी खुन-६, दरोडा-६, घरफोडी-८, चोरी-१७, पळवुन नेणे- २, एनडीपीएस-२, आर्म अॅक्ट-३ इतर-२६ अशा दाखल विविध गुन्ह्यात चांगली कामगिरी केली. सन-२०१६ मध्ये पोलीस महासंचालक यांचेकडील सन्मानचिन्ह मिळालेले आहे. निंबाळकर यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक मिळाल्याबद्दल पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button