![](https://khandeshtimes.in/wp-content/uploads/2024/11/images41.jpg)
जळगावच्या दीपक कुमार गुप्ता यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर घरकुल येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी 27 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता फेसबुक अकाउंट वर सहा वर्षांपूर्वीचा ऑडिओ क्लिप ठेवून स्वतःचा फोटो व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांचा फोटो वापरल्यावरून शैलेंद्र सपकाळे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दीपक कुमार गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की 27 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फेसबुक अकाउंट वर दीपक कुमार गुप्ता यांनी सहा वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप ठेवून स्वतःचा फोटो व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांचा फोटो ठेवून त्यावर यह वोही तक्रारदार असे टाकून अवैध वाहने सोडण्याचे सांगून समोरच्या व्यक्तीला फोन करून याबाबत सांगितल्यावर माझ्याकडून आता खाण्या करिता काही मिळाले नाही तर माझी तक्रार केली असे सांगितले, याबाबत जनतेची दिशाभूल करून बदनामी केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन दीपक कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.