![](https://khandeshtimes.in/wp-content/uploads/2025/01/UUUU-780x470.jpg)
वन विभागाची सलग दुसऱ्या दिवशी अवैध लाकूड चोरट्यांवर कारवाई
४३ हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
रावेर प्रतिनिधी
वनविभागाने मोहीम सुरू केली असून सलग दुसऱ्या दिवशी दि.२७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने राधेर गांना मिळालेल्या नुसार सावदा ते तांदलवाडी रस्त्याने गरत करीत असताना तांदळवाडी गवाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप संशयास्पद आढळून आली. त्या वाहनाचा पाठलाग सदर वन टीमने केला. वाहन क्रमांक एम एच ०४ नी एफ-७२६३ या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात २५ सागवानी इमारती नगांचा माल आढळून आला .
वाहनचालक युवराज सिताराम तायडे (वय ३५) रा. मांगलवाडी यांना मालाविषयी लागणाऱ्या परवानगीची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले , सागवान इमारती मालाचे मोजमाप रावेर आगार डेपो येथे वाहन चौकशी दरम्यान घेण्यात आले. मोजमाप १२२१ च. मी. एवढी असून मालाची किंमत ४३ हजार ११६ रुपये असून, ताब्यात घेतलेल्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीची किंमत अंदाज ३ लाख ४५ हजार रुपये आहे. पुढील चौकशी वाहन आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.
ही कारवाई ही घुळे वनसंरक्षक निनू सोमराज, उपवन संरक्षक जमीर शेख ,विभागीय वनधिकारी आर. आर. सदगीर तसेच चोपडा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, यावल सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, जुनोना वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील तसेच विशेष पेसा वनरक्षक रावेर रेंज बवऱ्या बारेला कियारसिंग बारेला, आकाश बारेला, निलेश बारेला यांच्या पथकाने केली.