![](https://khandeshtimes.in/wp-content/uploads/2025/01/images21.jpg)
ई-बस मार्गासाठी मनपाने मागवले अभिप्राय
जळगाव महापालिकेला ५० ई बसेस मिळणार
जळगाव प्रतिनिधी
ई-बस सेवेसाठी कुठे थांबा असावा व कोणकोणते मार्ग असावेत, याबाचत जळगावकरांचे मत जाणून घेतले जाणार असून नागरिकांनी १५ दिवसात अभिप्राय आणि सूचना महापालिकेकडे सादर कराव्यात असे आवाहन मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले आहे.
पीएम ई बस योजने अंतर्गत जळगाव महापालिकेला ५० ई बसेस मिळणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता भविष्याचा विचार करुन आतापासूनच नियोजन केले जात असून त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानाच्या जागेत बस डेपो उभारला जात आहे.
जुने बसस्थानकातून या बसेस सुटणार आहेत. तेथून १८ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या भागात बस गेली पाहिजे, तेथील प्रवाशांचा प्रतिसाद, कुठे थांबे असावेत हे जळगावकरांना सूचयावे लागणार आहे. महापालिकेच्या ११ व्या मजल्यावर परिवहन विभागात हे अभिप्राय व सूचना लेखी स्वरुपात सादर करायच्या आहेत. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या संकितस्थळावरही मत नोंदविता येण्णार आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव महापालिकेला ५० ई बसेस मिळणार आहे. वातानुकुलित बसेस त्याशिवाय भाडेही परवडणारे असल्याने अन्य शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जळगावलाही प्रतिसाद पाहून भविष्यात बसेसची संख्या वाढू शकते. मनपा प्रशासनाने १८ मार्ग निश्चित केले असून यामध्ये जुने बस स्थानक ते विद्यापीठ, डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खुर्द, पाळधी, वावडया, उमाळा फाटा, कानळदा, विदगाव, आसोदा-भादली, हरिविठ्ठल नगर, मोहाडी-धानोरा, पिंप्राळा-हुडको, छत्रपती संभाजी नगर, मेहरुण-एकनाथ नगर, निमखेडी गाव, संत गाडगेचावा चौक, शिवधाम मंदिर, शिरसोली व चिंचोली आदी मार्गाचा सामावेश आहे. तसेच अजुन काही मार्ग किंवा बस थांबा पाहिजे याबाबत अभिप्राय मागविण्यात आले आहेत.