
शिरसोली येथील गोरक्षकांवार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी – एकता संघटनेची मागणी
जळगाव प्रतिनिधी शिरसोली येथे गोमास विक्रीच्या संशयावरून तेथील गोरक्षकांनी एका 65 वर्षीय रऊफ शेख बुऱ्हाण या व्यक्ती चे कपडे काढून नग्न अवस्थेत गावातून धिंड काढून त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याची पत्नी हसीना बी बचावासाठी आली असता तिला सुद्धा मारहाण व तिचे विनयभंग करण्यात आले. परंतु पोलिसांनी या दोन वेगवेगळ्या घटनेला गांभीर्याने न घेता कोणताही प्रकारचा दखलपात्र गुन्हा दाखल केला नसल्याने एकता संघटनेचे फारुक शेख व त्यांचे सहकारी तसेच तांबापुर येथील रहिवासी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना सदर प्रकरणी २४ तासाच्या आत आरोपींना अटक न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयातच धरणे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे साकडे घातले.
जळगाव शहरातील तांबापुर येथील राहीवासी रऊफ शेख बुरहान हे शिरसोली येथे कामाला गेले असता त्या ठिकाणी गोरक्षकांनी गोमास विक्रीच्या संशयावरून त्याला कपडे काढून मारहाण केली, त्याच्या मुलाला व पत्नीला सुद्धा मारहाण करून तिचे विनयभंग केले.
पोलिसांनी २९ जानेवारी सकाळी १० वाजेपासून रऊफ व त्याच्या मुलाला अटक करून घेतली परंतु कोर्टात हजर केले नाही कारण रऊफ शेख यांना अत्यंत गंभीर अशी मारहाण असल्याने न्यायालयाच्या निदर्शनास येईल म्हणून नियमबाह्य डांबून ठेवले.
सुप्रीम कोर्टाने अंतरिम निकाल दिला असून ज्या ठिकाणी कोणी गोरक्षकाच्या नावाने हिंसा करत असेल व कायदा आपल्या हाती घेऊन अतिरेक करत असेल तर त्याच्यावर पोलिसांनी त्वरित कडक कायदेशीर करावी व यासाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी असे आदेश असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी एकता संघटना व तांबापूर वासिया तर्फे करण्यात आली.
फारुक शेख, मतीन पटेल, वसीम बापू, आरशद शेख ,इस्माईल पेंटर, अनिस शहा, मझहर खान, कासिम उमर, इम्रान शेख, शाहीर तेली,विकार खान, लुकमान शेख, सुलताना बी,यासह अनेक पुरुष व महिलांचा यात समावेश होता