खान्देश टाइम्स न्यूज | २८ जुलै २०२३ | जागतिक व्याघ्र दिन जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ आज दि.२८ रोजी उपजिल्हाधिकारी अर्पीत चौव्हान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जळगाव वनविभाग उपवनसंरक्षक प्रवीण ए. यांच्या मार्गदर्शनात लांडोरखोरी वनोद्यान येथे संप्पन झाला.
वन्यजीव संरक्षण संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, नितीन बोरकर वनक्षेत्रपाल जळगाव, निमंत्रक बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, आरोग्यदूत अरविंद देशमुख, लघुउद्योग भारतीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत १५० व्याघ्रदुतांच्या उपस्थितीत साजरा झाला. प्रास्ताविक बाळकृष्ण देवरे यांनी तर सूत्र संचालन योगेश गालफाडे यांनी केले.
राजेंद्र नन्नवरे आणि राहुल सोनवणे यांनी मुक्ताई भवानी अभयारण्यबद्दल आणि तेथील जैव विविधतेबद्दल विस्तृत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ झाली. वन्यजीव संरक्षण संस्था, आणि जळगाव वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली संपन्न होत आहे.
वाघांच्या संरक्षणासाठी आयोजित जनजागृती रॅलीत नासिक, नंदुरबार, वाशिम, ठाणे, मुंबई, अकोला, येथून व्याघ्रदूत सहभागी झाले आहेत. जळगाव ,नशिराबाद, भुसावळ येथे व्याघ्रदूतांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भुसावळ सेंट अलयांस आणि महाराणा प्रताप विद्यालयात पथनाट्य कार्यक्रम झाला. वाघ वाचवा जंगल वाचवा, घोषणा देत रॅली चारठाना येथे मार्गस्थ झाली. दि.२९ रोजी जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अभयारण्य परिसरातील गावागावात वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र सोनवणे, राजेश सोनवणे, मुकेश सोनार, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, तुषार वाघुळादे, प्रदीप शेळके, वासुदेव वाढे, निलेश ढाके, सप्नील महाजन, सतीश कांबळे, विजय रायपुरे, स्कायलेब डिसुझा, भरत शिरसाठ, चेतन भावसार, अवनी बहुद्देशीय संस्थेचे दीपक नाटेकर, उदय पाटील, शिवराज पाटील, संजीव सटाले परिश्रम घेत आहेत.