जळगांवराजकीय

चिखली येथे भारत निर्माणच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी : आ.एकनाथराव खडसे यांनी केली विधानपरिषदेमध्ये मागणी

जळगाव l चिखली l मुक्ताईनगर l येथे भारत निर्माण योजनेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकारणी उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद उपविभाग, मुक्ताईनगर यांनी केलेल्या चौकशीत रुपये १६,९२,०६८ एवढ्या रक्कमेची तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत आ.एकनाथराव खडसे यांनी चिखली येथे भारत निर्माणच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावेळी बोलता्ंना ते म्हणाले, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांनी दिनांक २७ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर यांना चौकशी अहवालाप्रमाणे रुपये १६,९२,०६८ एवढी रक्कम संबंधित तांत्रिक सेवा पुरवठेदार तत्कालीन अध्यक्ष व सचिव व सर्व तत्कालीन ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती, चिखली (ता.मुक्ताईनागर, जि.जळगाव) यांचेकडून वसूल करणेबाबत तसेच वसुलीस प्रतिसाद न मिळाल्यास आर आर सी किंवा फौजदारी कार्यवाही करण्याबाबत कळविले होते, असे असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

या प्रश्नाला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांनी दिनांक २१.०२.२०२३ रोजीच्या पत्रान्वये आर.आर.टी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, इस्लामपूर सांगली यांना त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करणेकामी नेमण्यात आले होते. मात्र सदर त्रयस्थ संस्थेबाबत संबंधित समिती सदस्य यांनी आक्षेप घेतल्याने त्रयस्थ तांत्रिक परीक्षण करण्यासाठी सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांनी अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती नियोजन संकल्पचित्र व यंत्रणेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button