खान्देशजळगांवशासकीयशिक्षणसामाजिक

अठरा पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी आपले स्वराज निर्माण केले – डॉ. करीम सालार

जळगावात इकरा पब्लिक शाळेतील मावळ्यांकडून शिवजयंती साजरी

अठरा पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी आपले स्वराज निर्माण केले – डॉ. करीम सालार

जळगावात इकरा पब्लिक शाळेतील मावळ्यांकडून शिवजयंती साजरी

जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील इकरा पब्लीक शाळेतील मावळ्यांनी सामाजिक एकतेचा संदेश देणारी आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली एक भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले रॅलीत शिवाजी महाराजांच्या काळातील मुस्लिम सरदार मावळ्यांचे नाव आणि पद उल्लेख केलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले व सर्वधर्मसमभावचा संदेश दिला.डॉ. करीम सालार यांच्या सुरेख संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.

यावेळी जी.एस ग्राउंड येथून भव्य रॅली काढून संपूर्ण बाजारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुस्लीम सुभेदारांचे पोस्टर्स फिरवण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास सांगून नेहमीच हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्या लोकांना या शिवजयंतीच्या निमित्ताने मावळ्यांनी चांगलीच चपराक दिली.

सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अशा पद्धतीने नेहमीच उपक्रम राबविले गेले तसेच यापुढेही राबवले जातील,असं प्रतिपादन श्री.सालार यांनी केले.अठरा पगड जातींना एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी आपले स्वराज निर्माण केले.शिवरायांच्या साथीला अनेक मुस्लिम मावळे होते.शिवाजी महाराज यांनी मशीदीचा जपणूक करुन नेहमीच सामाजिक समतेचा संदेश दिला.

या संपूर्ण इतिहासाला जळगांव शहरांतील इकरा शाळेतील मावळ्यांनी पुन्हा एकदा उजाळा देत सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.दरम्यान,साजऱ्या झालेल्या शिवजयंतीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.सदर कार्यक्रमास,शेख शकील,दानिश अहमद,आरीफ खान, आमीर खान सर तसेच मोठ्या संख्येने उर्दू शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व समाजातील शिवप्रेमी मावळे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button