खान्देशगुन्हेजळगांव

हेल्थ प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भागीदारीच्या बहाण्याने २०.७३ लाखांची फसवणूक

हेल्थ प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भागीदारीच्या बहाण्याने २०.७३ लाखांची फसवणूक

जळगाव: शहरातील एका व्यावसायिकाला भागीदारीचे आमिष दाखवून तब्बल २०.७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहसीन गुलाब पिंजारी (रा. प्लॉट नंबर ०१, सर्व्हे नंबर ३१९, हायवे नंबर ०६, संगम बेकरीजवळ, जळगाव) याने हेल्थ प्लस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भागीदारी देण्याचे आश्वासन देत फिर्यादी मोहम्मद शोएब शेख यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. मात्र, ठरलेल्या मुदतीनंतरही पैसे परत न करता तो कुटुंबासह फरार झाला आहे.

फिर्यादी शोएब शेख (रा. शाहूनगर, जळगाव) यांची आणि मोहसीन पिंजारी यांची ओळख गेल्या तीन वर्षांपासून होती. जून २०२४ मध्ये मोहसीनने जळगाव शहरात हॉस्पिटल सुरू करण्यासाठी भागीदारीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले.

१५ जून २०२४ रोजी १.५० लाखांचा एचडीएफसी बँकेचा चेक देण्यात आला.
त्याच दिवशी २.५० लाख रुपये रोख स्वरूपात दिले.
०१ जुलै २०२४ रोजी २०,००० रुपये, ०४ जुलैला ७५,००० रुपये व पत्नीचे सोने तारण ठेवून ३०,००० रुपये दिले.
१२ जुलैला २०,००० रुपये फोन-पे वर पाठवून, १०,००० रुपये रोख दिले.
२६ जुलै रोजी अजून १.२५ लाख रुपये देण्यात आले.

एकूण ७ लाख रुपये दिल्यानंतरही मोहसीनने मोठ्या मशिनरीसाठी आणखी १० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगत ७ लाख रुपये हरिश आफताब मिर्झा याच्याकडून घेतले आणि १४.७३ लाख रुपये घेतल्याचा कबुलीजबाब फिर्यादीने दिला.

याशिवाय, मोहसीन पिंजारी याने वसीम अख्तर जमील अख्तर यांच्याकडूनही ६ लाख रुपये घेतले. त्यामुळे त्याने एकूण २०.७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
सप्टेंबर २०२४ मध्ये पैसे परत मागितल्यावर मोहसीनने एक महिन्याचा अवधी मागितला. जानेवारी २०२५ मध्ये त्याने ६ जानेवारीला पैसे परत करतो असे सांगून अचानक गायब झाला. घर आणि दुकान बंद असल्याने शेजाऱ्यांकडे विचारणा केली असता तो संपूर्ण कुटुंबासह पळून गेल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस ३१८(४) आणि ३१६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वसंत तायडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button