आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकाला दोन पंटरसह पाचशे रुपयांची लाच स्वीकरतांना अटक

आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकाला दोन पंटरसह पाचशे रुपयांची लाच स्वीकरतांना अटक
छत्रपती संभाजीनगर ;– पेठ चेक पॉईंटवरील मोटार वाहन निरीक्षक व दोन खाजगी पंटरांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोटार वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे (वय 49, नेमणूक पेठ चेक पॉइंट) आणि खाजगी पंटर विनोद अर्जुन साळवे (वय 47) व मनोहर सुनील निकम (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
एका 29 वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. तक्रारदार लोकांसाठी सहलींचे आयोजन करतात. 20 मार्च रोजी ते साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमार्गे अंकलेश्वर, गुजरात येथे जात होते.
पेठ चेक पॉईंटवर मोटार वाहन निरीक्षक व खाजगी पंटरांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने दिली. सुरुवातीला दोन हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर पाचशे रुपये स्वीकारले गेले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्यांना आणि पंटरांना अटक केली.