खान्देशजळगांवसामाजिक

जागतिक क्षयरोग दिन साजरा ;रुग्णांना फूड बास्केटचे वाटप 

जागतिक क्षयरोग दिन साजरा ;रुग्णांना फूड बास्केटचे वाटप

शहर क्षयरोग केंद्र आणि रोटरी गोल्ड सिटी क्लबचा संयुक्त उपक्रम

जळगाव प्रतिनिधी

शहर क्षयरोग केंद्रामार्फत महानगरपालिकेच्या सभागृहात जागतिक क्षयरोग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात रोटरी गोल्ड सिटी क्लब आणि शहर क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगग्रस्त रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त वैष्णवी गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप, क्षयरोग विभागाचे जिल्हा समन्वयक कमलेश आमोदेकर, सिव्हिल हॉस्पिटलच्या चेस्ट विभागाचे प्रमुख डॉ. पुजारी, डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. कल्पेश गांधी तसेच रोटरी गोल्ड सिटी क्लबचे अध्यक्ष विनय बंसल आणि तुषार जाखेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते क्षयरोगग्रस्त रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर हंड्रेड डेज कॅम्पिंग या विशेष मोहिमेची सांगता करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. शहर क्षयरोग केंद्राने 10 मार्च ते 22 मार्च 2025 या कालावधीत केलेल्या कामाची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये विशेषतः एसएफ (संक्रमण नियंत्रण) क्षेत्रातील प्रगतीवर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला सर्व NTEP कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, जीएनएम आणि ANM कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक कमलेश आमोदेकर यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. विजय घोलप यांनी मांडली. शेवटी दीपक नांदेडकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाने क्षयरोगाविरुद्ध जनजागृती आणि रुग्णांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button