
नूतन मराठा महाविद्यालयातर्फे पद्मश्री चैत्राम पवार यांचा सत्कार
जळगाव प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावात शाश्वत विकासाचे प्रयोग करूप्न गावापा सर्वांगीण विकास करणारे पदमश्री चैत्रम पवार गांचा सत्कार सोहक जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित जळगाव संचलित नूतन मराठा महाविद्यालय येथे करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी डॉ. रणजीत चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. येशमुख यांच्या हस्ते सत्कारमूर्ती पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ. रणजीत चव्हाण यांनी ‘चालते बोलते विद्यापीठ म्हणजे चैत्राम पवार’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला. त्यांना स्वतःला आलेले अनुभव कथन करून उपस्थितांना चैत्राम पवार यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री . चैत्राम पवार यांनी बारीपाडा हे छोटेसे गाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पोहोचविले, याबद्दल माहितीपट दाखविण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पद्मश्री चैत्राम पवार यांनी सांगितले की स्वतः उच्चशिक्षित असून नोकरी न पत्करता घरच्यांचा विरोध पत्करून गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले. त्यासाठी घरातील, गावातील लोकांची मने वळवून त्यांना या कामात सहभागी करून घेतले. ‘जल,जंगल,जमीन,जन, जनावर’या पंचसूत्रीनुसार अनेक अडचणींना सामोरे जात बारीपाडा हे आदिवासी गाव जगाच्या नकाशावर दुसऱ्या क्रमांकाचे आदर्श गाव बनविले. त्यांच्या प्रवासात त्यांना जशी इतरांची मदत मिळाली,तसेच विरोधकही निर्माण झाले .परंतु त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले .त्यांच्या या कार्यास नूतन मराठा महाविद्यालयातर्फे सत्कार करून प्रोत्साहन देण्यात आले
.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल पाटील यांनी केले. आभार प्रा. तेजल पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.के.बी. पाटील, उपप्राचार्या एम. एस.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील प्रा.इंदिरा पाटील, प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. डी.आर.चव्हाण,प्रा.एन.जे.पाटील, ,प्रा राकेश गोरसे, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा डॉ मंगला तायडे,प्रा वंदना पाटील, प प्रा. सुनील गरुड , कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. आर .बी. देशमुख यांनी मेहनत घेतली तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..
नूतन मराठा महाविद्यालयात विविध वृक्षांचे वृक्षारोपण
नूतन मराठा महाविद्यालयात धुळे जिल्ह्यातील बारापाडा स्थित माननीय चैत्रामजी पवार पद्मश्री पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते तसेच जळगावचे प्रसिद्ध डॉ.रणजीत चव्हाण व प्राचार्य डॉ एल.पी. देशमुख यांच्या हस्ते विविध उपयोगी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी बाळासाहेब नाईक ,अनिल पाटील उपप्राचार्य डॉ. के बी .पाटील व प्रा. शिवराज पाटील उपस्थित होते.