खान्देशजळगांवदेश-विदेशराजकीयशासकीयसामाजिक

घरगुती गॅस महागला ! सिलिंडरच्या दरात थेट ५० रुपयांची वाढ ; सामान्य जनतेच्या खिशाला कात्री

घरगुती गॅस महागला ! सिलिंडरच्या दरात थेट ५० रुपयांची वाढ ; सामान्य जनतेच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली वृत्तसंस्था

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसली आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली असून, ही वाढ आजपासून (सोमवार, ७ एप्रिल) लागू करण्यात आली आहे. याची घोषणा पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली.

नवीन दर काय आहेत?

दिल्ली: ₹८०३ → आता ₹८५३

मुंबई: ₹८०२.५० → आता ₹८५२.५०

८ मार्च २०२४ रोजी महिला दिनानिमित्त सिलिंडर ₹१०० रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीतील किंमत ₹९०३ वरून ₹८०३ झाली होती. पण आता ती पुन्हा वाढली आहे.

तेल कंपन्यांना घरगुती सिलिंडर कमी दरात विकल्यामुळे सुमारे ₹४१,००० कोटींचं नुकसान सहन करावं लागलं, अशी माहिती पुरी यांनी दिली. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठीच ही दरवाढ केल्याचं सांगण्यात आलं आहे.

व्यावसायिक सिलिंडर मात्र स्वस्त!

१ एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ₹४४.५० ची घट केली होती.एलपीजीच्या दरात दरमहा बदल केला जातो. हे दर ठरवताना खालील घटक विचारात घेतले जातात:आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर डॉलर-रुपया विनिमय दर, वाहतूक खर्च , स्थानिक कर व डीलर कमिशनयानुसार गॅस सिलिंडरचे दर ठरतातसरकार केवळ अनुदानित सिलिंडरवरच काही प्रमाणात भरपाई करते. उर्वरित ग्राहकांना पूर्ण दर मोजावे लागतात.

दरमहा महागाईचा भडका उडत असतानाच गॅस सिलिंडरची दरवाढ ही सामान्य माणसाच्या डोक्यावर नवे संकट उभं करत आहे. यामध्ये दिलासा फक्त व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर वापरणाऱ्यांना मिळालाय, घरगुती ग्राहक मात्र पुन्हा एकदा महागाईच्या फेऱ्यात सापडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button