खान्देश टाईम्स न्यूज l ०१ ऑगस्ट २०२३ l सुब्रतो मुखर्जी अंतर शालेय फुटबॉल १४ वर्षा आतील महानगरपालिका स्तरीय स्पर्धेला जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन करताना महापौर जयश्री महाजन यांनी उपस्थित सतरा संघांमध्ये एकही मराठी शाळेचा संघ सहभागी न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली व त्याच प्रमाणे म ना पा च्या शाळांचा सुद्धा सहभाग नसल्याने पुढील स्पर्धेला शहरातील मराठी शाळा व महानगरपालिका शाळा च्या प्रमुखांनी नोंद घ्यावी असे आव्हान सुद्धा त्यांनी या वेळी केले.
स्पर्धेचे प्रास्ताविक जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी सादर करताना १७ सहभागी संघा बाबत माहिती विशद केली तसेच मनपा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय च्या समन्वयाचा अभाव सुद्धा प्रकट केला.
तसेच खेळाडूंना म.ना.पा तर्फे पारितोषिक देण्यात यावे अशी सुद्धा मागणी केली.
प्रमुख अतिथींचे स्वागत संघटनेतर्फे फारुक शेख, प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे ,अब्दुल मोहसीन, व हिमाली बोरोले यांनी केले.
औपचारिक उद्घाटन :
या स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांनी फुटबॉलला कीक मारून व पहिल्या सामन्याचे नाणेफेक करून केले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून संघटनेचे सचिव फारुक शेख, मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, डॉक्टर अनिता कोल्हे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन व सर्व शाळेचे क्रीडाशिक्षक यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन अब्दुल मोहसीन यांनी तर आभार क्रीडा अधिकारी भामरे यांनी मानले
सामन्याचा निकाल :
पोदार विजय विरुद्ध सेंट जोसेफ ३-०
अंगलो उर्दू विजयी सेंट
टेरेसा १-०
एल एच पाटील विजय सरस्वती ४-०
ए टी झांबरे विजय ओनिऑन स्टेट २-०
ईकरा शाहीन विरुद्ध गोदावरी २-०
सेंट लॉरेन्स विजय आर आर इंग्लिश १-०
ओरियन सीबीएससी विजय रायसोनी प्रेम नगर ९-०
पोतदार विजय रोझलँड ५-०
मिल्लत हायस्कूल विजयी उज्ज्वल स्प्रॉडर ४-०