खान्देशजळगांव

जळगावमध्ये सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; ग्राहकांना मोठा आर्थिक झटका

जळगावमध्ये सोन्याच्या दराने गाठला उच्चांक; ग्राहकांना मोठा आर्थिक झटका

जळगाव | प्रतिनिधी – सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने अक्षरशः झेप घेतली असून, १६ एप्रिल रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने नवीन उच्चांक गाठला आहे. एका दिवसात तब्बल १,३०० रुपयांनी वाढ होऊन सोन्याने पहिल्यांदाच विनाजीएसटी ९४ हजाराचा टप्पा पार केला आहे. या दरवाढीचा थेट फटका लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसला असून, सराफ बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून वळवले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. याशिवाय चांदीच्या दरातही मोठी झपाट्याने वाढ झाली आहे, जी ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ देत आहे.

१६ एप्रिलचे दरवाढीचे आकडे

२२ कॅरेट सोनं (विना GST): ₹८६,७२० प्रति १० ग्रॅम

२४ कॅरेट सोनं: ₹९४,६०० प्रति १० ग्रॅम
(GSTसह: ₹९७,४३८)

चांदी: ₹९७,००० प्रति किलो (स्थिर)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अंदाजानुसार, लवकरच सोन्याचा दर ₹१ लाखाचा टप्पा गाठू शकतो.
३ महिन्यांत १७,७०० रुपयांची वाढ

१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा दर ₹७६,९०० (GSTसह ₹७९,२०७) होता. मात्र, केवळ ३ महिन्यांत ३४ वेळा दरवाढ झाल्याने १६ एप्रिल रोजी हा दर ₹९४,६०० वर पोहोचला आहे. या कालावधीत सोन्याच्या दरात सुमारे ₹१७,७०० ची वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button