खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

जळगाव शहरात गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

जळगाव शहरात गावठी पिस्तूलसह तरुण जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील बिग बाजार सर्कल परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका तरुणास जळगाव शहर पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र व्यवहारावर आळा बसण्यास मदत होणार आहे.

पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांची माहिती गोळा करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना गुप्त माहिती मिळाली की, शहरातील बिग बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोस्ती बिअर शॉपसमोर एक संशयित व्यक्ती गावठी पिस्तूलसह फिरत आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तत्काळ छापा टाकून त्या इसमास ताब्यात घेतले.

सुरुवातीस त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव हर्षल जितेंद्र कदम (वय 28, रा. एस. के. ऑईल मिलजवळ, जळगाव) असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल, मॅगझीनसह, किंमत अंदाजे ₹15,000 , एक बनावटी जिवंत काडतूस, किंमत ₹500 अशा प्रकारे एकूण ₹15,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पो. कॉ . अमोल अशोक ठाकूर यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. 366/2025, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सफो. सुनिल पाटील, पोहेकी उमेश भांडारकर, पोहेको सतिश पाटील, पोहेको नंदलाल पाटील, पोहेको योगेश पाटील, पोहेकी विरेंद्र शिंदे, पोहेको दीपक शिरसाठ, पोना भगवान पाटील, पोकॉ. अमोल ठाकूर, पोकी भगवान मोरे, पोकी राहुलकुमार पांचाळ, पोको प्रणय पवार यांच्या पथकाने केली आहे. तपास सपोनि दिपक सुरवळकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button