खान्देशगुन्हेजळगांव

पारोळा तालुक्यातील टिटवी येथे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा तालुक्यातील टिटवी येथे शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा (प्रतिनिधी): तालुक्यातील टिटवी गावात एका ३५ वर्षीय शेतमजुराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी, १० मे रोजी मध्यरात्री घडली. ही घटना पहाटे उघडकीस आली असून, पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मयत तरुणाचे नाव अर्जुन रमेश भिल (वय ३५, रा. टिटवी, ता. पारोळा) असे आहे. अर्जुन हा कुटुंबासह गावात राहत होता आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो घराजवळील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ झोपण्यासाठी गेला होता. सकाळी त्याचा चुलत भाऊ झुलाल धनराज भिल शाळेजवळून जात असताना त्याने अर्जुनला सुबाभूळच्या झाडाला रुमालाने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्याने तातडीने याची माहिती अर्जुनच्या भावाला आणि वडिलांना दिली. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला, तर टिटवी गावात शोककळा पसरली आहे. पारोळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button