जळगाव l ३ ऑगस्ट १०२३ l कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ चा बहुसन्मानित पुरस्कार हा वर्ष २०२१-२२ चा केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च, ला जाहीर झाला आहे. ह्याप्रसंगी इंस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी समस्त शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि ह्या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि संस्थेच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शनासाठी आभार व्यक्त केले.
आयएमआरने नुकतेच नॅक मध्ये ‘ए’ श्रेणी प्राप्त केली असून राष्ट्रिय स्तरावरील उच्च मानांकित अश्या ‘एनबीए’ची सुद्धा एमबीएसाठी मान्यता मिळवली आहे. ही मान्यता प्राप्त करणारे हे खान्देशातील पहिले इंस्टीट्यूट होय. तसेच इंस्टीट्यूटकडे सर्वाधिक पीएचडीचे अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक आहेत. नियमित कार्यशाळा आणि सेमिनारद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी इंस्टीट्यूट नेहमी प्रयत्नशील असते. सध्याच्या काळात आयएमआरने इन्फोसिस आणि टाटा स्ट्राइव्ह सारख्या जागतिक कंपन्याबरोबर विद्यार्थ्यांच्या स्कील डेव्हेलोपमेंटसाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. १००% प्लेसमेंट सहायता देतांना इंस्टीट्यूटने उच्चतम १२ लाखाचे तर सरासरी ४ लाखाचे पैकेजच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच ह्यावर्षी विद्यार्थ्यांसाठी एकूण ४१ नामांकित कंपन्याच्या नोकऱ्यांची ऑफर देण्यात आल्या, ज्यात प्रामुख्याने एचडीएफसी बैंक, एक्सिस बैंक, आयडीबीआय बैंक, इंडियामार्ट, उज्जीवन स्मॉल फायनांस बैंक, टीसीएस, इन्फोसिस, कैपजेमिनी, विप्रो, सुप्रीम, अलोहा टेक्नोलॉजी, कोटक बैंक, एसबीआय, बायजूस, बजाज फिनसर्व, एमआरएफ आणि ओरिएन्ट सिमेंट शामिल होत्या. त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये रोजगार कौशल्यच्या ट्रेनिंगसाठी इंस्टीट्यूटतर्फे आयआयएम-मेकइंटर्न आणि बार्कलेज-रुबीकौन अश्या राष्ट्रीय दर्जाच्या ट्रेनिंग पार्टनरच्या माध्यामतून नोकरीभिमुख ट्रेनिंग देण्यात आली तसेच ट्रेनिंग एंड प्लेसमेंट डिपार्टमेंटतर्फे कौशल्य विकासासाठी एकूण २४ वर्कशॉप घेण्यात आले ज्यात रेज्युमे कसा बनवावा, इंटरव्यूची तयारी कशी करावी, मॉक इंटरव्यू, ग्रुप डिस्कशनमध्ये कसे यशस्वी व्हावे, नोकरीसंदर्भित प्रश्नांचे उत्तर कसे द्यावे, कॉर्पोरेट इंटरव्यू कसे द्यावे आणि स्कील डेव्हेलोपमेंट सारख्या विषयांवर आधारित होते. विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक उन्नतीसाठी ४ इंडस्ट्रीयल विजिट आयोजित करण्यात आल्या, ज्यात सुप्रीम इंडस्ट्रीज, हिताची एस्तेमो ब्रेक सिस्टिम्स, स्पेक्ट्रम आणि चंडीगडची अतुल फास्त्नर्स शामिल होत्या. तसेच जागतिक स्तरावरील नोकरी संदर्भातील माहितीसाठी लंडन विद्यापीठाचे डॉ. रिचर्ड जॉर्ज ह्यांच्याशी विध्यार्थ्यानी इंस्टीट्यूटच्या माध्यामतून संवाद साधला. १० हजारापेक्षा अधिक माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी संघटनेद्वारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थे सोबत जोडले आहे. १९८६ सालापासून सर्वाधिक गोल्ड मेडल्स इंस्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असलेले आयएमआर उच्च प्रतीच्या शिक्षणासोबत उत्कृष्ट महाविद्यालयाची परंपरा भविष्यातही निरंतरपणे ठेवण्याचा मानस ह्यावेळी व्यक्त करण्यात आला.